सुगम संगीत म्हणजे नेमकं काय

अनेक मराठी घरांसारखे आमच्या घरातही सुगम संगीत मी मोठे होत असतांना सतत वाजत असे. अशा भोसलेंच्या नवीन cassettes पासून वीणा सहस्त्रबुद्धे ह्यांच्या नवीन गीतमालिका, एवढंच काय तर शंकर महादेवन ने सुद्धा मराठी सुगम संगीताचे अल्बम त्याकाळी म्हणजे १९९०स मध्ये काढले .
पण सुगम संगीत म्हणजे नेमकं काय आणि हे आलं कुठून?

ह्या संगीतात काहीप्रमाणात नावीन्याला खूप वाव आहे. रागमालिका, तालमालिका, ह्यांची composites, crooning – किंवा हळुवार आवाजात microphone लाच ऐकू जाईल असे गाणे, आणि असामान्य कविता आणि काव्यरचना ह्यांना चालबद्ध करणे इत्यादी. मुख्यतः भाव व्यक्त करणे. सुगम ह्याचा अर्थ समजायला सोपे किंवा रमायला सोपे असा होतो. तास राग ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा रंजयंति इति रागः म्हणजे जो रंजन करतो तो राग असा देखील काही जण सांगतात.

काही प्रमाणात सुगम संगीत ह्याचा अर्थ केवळ जे शास्त्रीय संगीत न्हवे ते, असाच होतो. पण कैक लोक light classical अथवा ललित संगीत ह्यलादेखील सुगम संगीत म्हणतात ह्यातले काही प्रकार – ठुमरी, टप्पा, कजरी, दादर, होरी, ह्यांनादेखील काही सुगम संगीतात मोडतात. ज्याकाळी सुगम संगीताचा उगम झाला, त्याकाळी शास्त्रीय नसून, सिनेमात नसलेले, कविताप्रभुत्व दर्शवणारे, आणि शास्त्रीय किंवा लोकसंगीताशीही सारासार सम्बन्ध नसणारे ते नवं संगीत ह्यालाच सुगम संगीत म्हणता येईल. संगीतातील अनेक प्रकारांप्रमाणे, ह्यात काय मोडते आणि काय नाही – ह्याचे निर्णय कोणी घेतले, ह्याचे अध्ययन करणे महत्वाचे ठरते. इतरांचे असेही मत असते कि light classical म्हणजे ‘शास्त्रीय सुगम संगीत’ आणि भावगीते हे आधुनिक सुगम संगीत. १९९०स च्या नंतर निघालेल्या लक्षावधी सारेगम इतर इतर शोज मुळे ह्या संगीताला आणि त्याच्या तत्कालीन स्वरूपाला खूपच वाव मिळाला.

ह्या काळचे म्हणजे १९२० च्या सुमारास प्रचलित झालेली बैठकीची लावणी, तिथपासून ते मराठी टीव्ही वरचे टायटल सॉंग इथपरेंतचा महाराष्ट्राचा आणि मराठीच्या अस्तित्वाचा आणि सध्याच्या स्वतंत्र स्टेटस मिळेपरेन्तचा प्रवास सुध्दा लांबच आहे. ह्या वेगवेगळ्या वेळातले बदलते वैचारिक विश्व आपण नजरेसमोर ठेवले पाहिजे.

फक्त मराठीत सुगम संगीताबद्दल विचार घडत नसून कन्नड आणि गुजराती ह्या भाषेतही सुगम संगीत, casette अलबम आणि ‘नूतन’ किंवा आधुनिक संगीत ह्या विचारधारा निर्माण होऊ लागल्या. नेपाळी भाषेतसुद्धा त्याकाळी आधुनिक संगीताचे अनेक प्रयोग झाले, एवढेच काय तर १९५० च्या सुमारास जपानमध्ये निर्माण झालेले एन्का हे संगीत सुद्धा कैकवेळा सुगम संगीताशी संबंध वाटावा एवढे सारखे वाटू शकते.

ह्यामागे अनेक करणे आहेत. संगीत विचार पुस्तकामध्ये अशोक रानडे ह्यातल्या काही घडामोडी आपल्याला सांगतात. १- संगीत लेखन, म्हणजेच notation मध्ये संगीत लिहून काढणे हा प्रकार २०व्या शतकातला आहे. २- संगीताचा अभ्रासक्रम तयार करणे, संगीत शिक्षणाबद्दल लोकांमध्ये उत्साह निर्माण करणे. ३- संगीताबद्दल सौंस्था स्थापन करणे. ४- राष्ट्र संगीत, band संगीत, इत्यादी नवीन प्रकारांची निर्मिती . ५. नवीन वाद्यांचा प्रयोग, त्यात पाश्चिमात्य वाद्यांचा प्रयोग.
ह्याला मी आपल्या काही घडामोडी जोडू इचछीते . ६. रेडिओ, LP, त्यानंतर casettes आणि त्याचे receivers, players इत्यादी consumersना उपलब्ध होणे. ७. microphone प्रचलित होणे, ८. अर्बन migration, अर्थात, हजारो लोकांने गवे सोडून शहरात वसणे ९. नाट्यसंगीतातली पदं आणि त्यामुळे शास्त्रीय संगीताचे एक स्वरूप लोकांना ओळखीचे होणे, इत्यादी .

पण ह्यात सामाजिक बदलही अजून नोंद करण्यासारखे आहेत. रानडे पुढे लिहितात :
धर्म आणि संगीत ह्यांच्या नात्यात थोडी का होईना, तफावत निर्माण होणे.
इंग्रजी साहित्याची लोकांना ओळख, त्यातली स्त्रीची भूमिका, व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री पुरुषांच्या संबंधांचे स्वतंत्र स्थान निर्माण होणे, फिल्म इतर द्वारे ह्याचे प्रचालन.
तरुण पिढीला ह्या इकॉनॉमी मध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वर्चस्व मिळणे .

असेच सौंस्क्रुतिक बदल आपल्याला साहित्य इत्यादी चा अभ्यास करतांनाही आढळतात.

music for the sake of itself , किंवा संगीतापुरते संगीत ह्याचा रागव्यवस्थेमध्ये सुगम संगीतापेक्षा अतिशय वेगळा अर्थ लागतो. रानडे आपल्याला बजावतात: आधुनिकता आणि आधुनिकतावाद ह्या दोन मध्ये फरक आपणच ओळखला पाहिजे.

मराठी सुगमसंगीताचे हृदयनाथ, श्रीधर फडके इतर कलाकार कार्यरत असतानाचे स्वरूप आजकालच्या म्हाताऱ्या माणसांना ‘pure’ सुगम संगीत असे वाटत असले, तरी – बदल हा एकाच नियम कुठल्याही काळाच्या कलेमागे असतो एवढे मात्र आपणच लक्षात ठेवावे. आपल्याच आठवणीत भुलवून जाण्यासाठी इतरांच्या संगीताला हिणवणे गरजेचे नसते.